Advertisements
Advertisements
प्रश्न
पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.
उत्तर
संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणुवस्तुमानाएवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे 6.022 × 1023 रेणू, म्हणून याला ‘ॲव्हाेगड्रो अंक’ असे म्हणतात व तो NA या संज्ञेने दर्शवितात.
उदा:
- ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान 32 u असते, म्हणून 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे एक मोल होय. कार्बनचे अणुवस्तुमान 12 u आहे. 12 ग्रॅम कार्बन म्हणजे 1 मोल होय.
- पाण्याचे रेणुवस्तुमान 18 u असते, म्हणून 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी असून यात 6.022 × 1023 पाण्याचे रेणू असतात.
- पदार्थांच्या मोलची संख्या n = `"पदार्थांचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थांचे रेणुवस्तुमान"`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
सोडिअम क्लोराईड
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
मॅग्नेशिअम ऑक्साईड
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
कॅल्शिअम कार्बोनेट
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
32 ग्रॅम ऑक्सिजन
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
90 ग्रॅम पाणी
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
7.1 ग्रॅम क्लोरिन