Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर
१. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल (इंटरनेट) ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची प्रसारमाध्यमे असून लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी, तसेच माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
२. वर्तमानपत्रांमधून वर्तमान घडामोडी, तसेच काही सदरांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक घटना समजतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही वर्तमानपत्रांशी जोडले जातात.
३. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे दाखवण्यास दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम प्रभावी ठरते.
४. आकाशवाणीतर्फे विविध बोलीभाषांमध्ये मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
टिपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.