Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साइड मिळवले.
टीपा लिहा
उत्तर
- मॅग्नेशिअम ऑक्साइड (पांढऱ्या रंगाचा स्थायू पदार्थ) हे HCl मध्ये पूर्णपणे विरघळतो, परंतु विरल NaOH च्या द्रवणात तसेच राहतो.
- मॅग्नेशिअम ऑक्साइड हे एक आम्लारी आहे. जेव्हा हे HCl मध्ये घातले जाते, तेव्हा आम्ल-आम्लारी उदासिनीकरणाची अभिक्रिया सुरू होते, आणि मॅग्नेशिअम क्लोराइड आणि पाणी तयार होते.
\[\ce{\underset{{हायड्रोक्लोरिक ॲसिड}}{2HCl} + \underset{{मॅग्नेशिअम ऑक्साइड}}{MgO} -> \underset{{मॅग्नेशिअम क्लोराइड}}{MgCl2} + H2O}\] - जेव्हा मॅग्नेशिअम ऑक्साइड विरल NaOH मध्ये घातले जाते तेव्हा अशी कोणतीच अभिक्रिया घडत नाही.
shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?