Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.
\[\ce{NaOH(aq) + H2SO4(aq) -> Na2SO4(aq) + H2O(l)}\]
उत्तर
पायरी 1 : दिलेले समीकरण पुन्हा लिहा :
\[\ce{NaOH_{(aq)} + H2SO4_{(aq)} -> Na2SO4_{(aq)} + H2O_{(l)}}\]
पायरी 2 : या असंतुलित समीकरणाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंच्या संख्याची तुलना करा :
मूलद्रव्ये |
अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या (बाणाच्या डाव्या बाजूस) |
उत्पादितांमधील अणूंची संख्या (बाणाच्या उजव्या बाजूस) |
Na |
1 |
2 |
S |
1 |
1 |
O |
5 |
5 |
H |
3 |
2 |
दोन्ही बाजूंना, अभिक्रिया काकडे आणि उत्पादितांमधील ऑक्सिजनच्या अणूंची संख्या समान आहे. म्हणून दोन्ही बाजूंना सोडिअमच्या अणूंची संख्या समान करा.
पायरी 3 : सोडियम अणू संतुलित करताना :
सोडियम अणू |
अभिक्रियाकारकांत |
उत्पादितांत |
(1) सुरुवात करताना |
1 (NaOH मध्ये) |
2(Na2SO4 मध्ये) |
(2) संतुलित करताना |
1 × 2 |
2 |
सोडिअमचे अणू समान करताना 2 हा योग्य सहगुणक अभिक्रियाकारकांमधील NaOH करिता लावला. म्हणजे अर्धवट असलेले संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे होईल :
\[\ce{H2SO4 + 2NaOH -> Na2SO4 + H2O}\]
पायरी 4 : हायड्रोजनचे अणू संतुलित करताना :
हायड्रोजन अणू |
अभिक्रियाकारके |
उत्पादिते |
(1) सुरुवात करताना |
2 (H2SO4 मध्ये) |
2 (H2O मध्ये) |
(2) संतुलित करताना |
4 |
2 × 2 |
हायड्रोजनचे अणू समान करण्याकरिता, 2 हा योग्य सहगुणक उत्पादितांमधील H2O करिता लावला.
म्हणून अर्धवट असलेले संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे होईल :
\[\ce{H2SO4 + 2NaOH -> Na2SO4 + 2H2O}\]
समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या मूलद्रव्यांमधील अणूंची संख्या मोजा. दोन्ही बाजूंना अणूंची संख्या समान आहे. म्हणून, संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे :
\[\ce{H2SO4 + 2NaOH -> Na2SO4 + 2H2O}\]
अगोदर सांगितल्यानुसार अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरण लिहा :
\[\ce{2NaOH_{(aq)} + H2SO4_{(aq)} -> Na2SO4_{(aq)} + 2H2O_{(l)}}\]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.
संतुलित समीकरण
पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.
\[\ce{H2S2O7(l) + H2O(l) -> H2SO4(l)}\]
पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.
\[\ce{SO2(g) + H2S(aq) -> S(s) + H2O(l)}\]
पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.
\[\ce{Ag(s) + HCl(aq) -> AgCl↓ + H2↑}\]