Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय हितसंबंध
उत्तर
राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधांत समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.
- आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट ______ बनले आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.
भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?
प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते, त्याची माहिती मिळवा.