Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर १
- इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले.
- ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.
- आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच. त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर २
१. एकोणिसाव्या-विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांनी प्राचीन भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्यासाठी केलेल्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.
२. महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला.
३. यापासून प्रेरणा घेऊन न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडणारा 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' या ग्रंथाची निर्मिती केली.
४. यामुळे, दक्षिण भारताच्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
यावरून असे म्हणता येईल, की राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावातून प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
संबंधित प्रश्न
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.