Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात.
- काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हा अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरीत्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
- त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
- याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
- भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठरावीक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
- त्या त्या कालावधीत, अनुक्रमे पृष्ठवंशीय; मत्स्य, उभयचर, सरिसृप; नंतर मध्यजीव महाकल्प सरिसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
- उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.
shaalaa.com
उत्क्रांती (Evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.
उत्क्रांती म्हणजेच ______ होय.
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
उत्क्रांती
उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?