Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
उत्तर
प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय
(अ) विज्ञान: मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
(ब) कला: कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
(क) व्यवस्थापनशास्त्र: उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
उपयोजित इतिहास
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते.
कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
विज्ञान
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
कला
पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
व्यवस्थापनशास्त्र