Advertisements
Advertisements
प्रश्न
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
उत्तर
भारतात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांमध्ये मोर हा एक अद्वितीय पक्षी आहे. त्याचा डोक्यावरचा सुंदर तुरा, शोभिवंत मान आणि हिरव्या आणि निळ्या-जांभळ्या रंगात लेपित पंख खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मोरपिसावर निळा-हिरवा चमकणारा डोळा फारच आश्चर्यकारक आणि कलात्मक आहे. इतर पक्ष्यांपेक्षा मोराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. पावसात तो त्याची सगळी पिसे फुलवून थुईथुईई नाचतो. या झाडावरून त्या झाडावर उडतानाही त्याचे स्वरूप खूप आकर्षक दिसते. तो ऐटीत चालतो. मोराचा डौल काही औरच असतो. लहान मुलांना मोरपिसाचा स्पर्श व वहीत ते जपून ठेवायला खूप आवडते. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे. या सर्व कलात्मक गुणांमुळे 'राष्ट्रीय पक्षी ' हा मानाचा किताब देण्यास मोर हा योग्यं पक्षी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.
जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) आफ्रिकेत आढळणारे मोर | (१) हिरव्या छटांचे |
(आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर | (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे |
(इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर | (३) राखाडी रंगाचे |
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______
कारण शोधा आणि लिहा.
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- ______
- ______
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- ______
- ______
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.