Advertisements
Advertisements
प्रश्न
सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल?
(आ) प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरांत दिसत नाहीत व का?
(इ) उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का?
(ई) उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत?
उत्तर
(अ) हंबोल्ट हा शीत सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथील पर्जन्याचे प्रमाण कमी होते. तसेच त्यामुळे तेथे ओसाड वाळवंटी प्रदेश तयार झाले आहे.
(आ) प्रति विषुववृत्तीय प्रवाह हे हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर या महासागरांत दिसत नाहीत. कारण हे महासागर या प्रवाहापासून दूर तसेच विषुववृत्तीय प्रवाह हे अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरातील विषुवृत्तीय पट्ट्यातच वाहतात.
(इ) उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाहीत. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. त्यामुळे शीत प्रवाह तेथे पोहचू शकत नाही.
(ई) अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक, न्यू फाउंडलँड बेट इत्यादी उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहेत.