Advertisements
Advertisements
प्रश्न
सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते?
उत्तर
सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात. नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागरजलपृष्ठाशी घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढे वाहून नेतात. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने वाहतात. किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते.
एखाद्या प्रदेशात वर्षभर एकाच दिशेने वाहणारे वारे असतील तर त्याचा परिणाम सागरजलाच्या हालचालीवर होतो. उत्तर गोलार्धात ०° ते ३०° उत्तर अक्षवृत्तीय दरम्यान पूर्वीय वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. तर दक्षिण गोलार्धात ०° ते १३° दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान ते आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात सागरजलाची हालचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांचे चक्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सुरू होते. अशाप्रकारे सागरी प्रवाहांना दिशा मिळते.