Advertisements
Advertisements
प्रश्न
शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा.
उत्तर
ठरावीक तापमानास हवेच्या ठरावीक आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प (पाण्याची वाफ) सामावले जाऊ शकते. तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते.
शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिचे तापमान कक्ष तापमानापेक्षा (Room temperature) बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान कमी होते. परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.
खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.
हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?
एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.
सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.
दवबिंदू तापमान म्हणजे काय?
दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.
निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.