Advertisements
Advertisements
प्रश्न
शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?
पर्याय
8
15
12
9
उत्तर
9
स्पष्टीकरण:
शुभम आणि अनिल यांना मिळालेल्या केळ्यांची संख्या 3 : 5 आहे.
शुभम आणि अनिल यांना मिळालेल्या केळ्यांची संख्या अनुक्रमे 3x आणि 5x असे मानू.
∴ 3x + 5x = 24
⇒ 8x = 24
⇒ x = 3
∴ 3x = 3 × 3 = 9
∴ शुभमला मिळालेल्या केळींची संख्या = 3x = 3 × 3 = 9
अशा प्रकारे, शुभमला 9 केळी मिळाली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
0.64%
आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा.
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.
1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
36, 90
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]