Advertisements
Advertisements
प्रश्न
एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
उत्तर
आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 3x सेमी आणि x सेमी आहे असे मानू.
आयताची परिमिती = 36 सेमी
∴ 2(लांबी + रुंदी) = 36 सेमी
∴ 2(3x + x) = 36
∴ 2 × 4x = 36
∴ 8x = 36
∴ x = 4.5
आयताची लांबी = 3x = 3 × 4.5 = 13.5 सेमी
आयताची रुंदी = x = 4.5 सेमी
अशा प्रकारे, आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 13.5 सेमी आणि 4.5 सेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.
`7/16`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तर काढा.
r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डझन, 120 नग
जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.
`[7b - 4a]/[7b + 4a]`