Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर
पूर्वीच्या काळी लळीत, गोंधळ, पोवाडे, कीर्तन, दशावतार, खेळे, तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते. संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात, ही धारणा होती. यातच पुढे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर' नाटका नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांची 'संगीत शाकुंतल' व 'संगीत सौभद्र' ही नाटके संगीतामुळे गाजली. त्यानंतरचे कृ. प्र. खाडिलकर यांचे 'मानापमान' हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे - यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वांच्या गायिकीमुळे खूप लोकप्रिय ठरले. रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यांतून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आशयाचे व कथानकाला गती देणारी पदे, शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो. लोकसंगीत व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ, संगीतातील वादये व समर्थ गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात. ही सर्व संगीत नाटकांची वैशिष्ट्ये असल्यामुळे नाट्येतिहासात 'संगीत नाटक' राष्ट्रीय पातळीवर मानाचे ठरले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.
खालील कृती करा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.