Advertisements
Advertisements
प्रश्न
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
उत्तर
ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघातात मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिस लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.
हलकीफुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते.
या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते. या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.