Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
कथा, कविता, कादंबरी इत्यादी अन्य साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. त्यांत लेखक व वाचक असे दोनच घटक असतात. परंतु 'नाटक' या साहित्यप्रकारातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, काव्य, चित्रकला अशा बहुतेक कलांचा समावेश होतो, त्यामुळे नाटक हा सांघिक कलाविष्कार ठरतो.
नाटककार नाटकाची संहिता तयार करतो. व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्यात संवाद असतात. रंगसूचना देऊन नाट्यसंहिता तयार होते. दिग्दर्शक त्या नाटकातील भावाशयाला योग्य दिशा देऊन ते रंगमंचावर प्रयोग क्षम उभे करतो. अभिनेते नाटकातील पात्राच्या भूमिका अभिनित ध्वनी द्वारे व शब्दांच्या चढ-उतारांकरवी वठवतात. नेपथ्य कार नाटकातील दृश्याची मांडणी करतो. प्रकाश-योजनाकार ते दृश्य वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून प्रकाशित करतो. पार्श्वसंगीत घटनेच्या आशयाला पूरक रस निर्माण करते. नाट्यप्रयोग जेव्हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत दृक्-श्राव्य माध्यमातून साकार होतो तेव्हा नाटकाची खरी पूर्तता होते.
अशा प्रकारे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार व सुजाण प्रेक्षक हे नाटकाचे पाच घटक एकत्र येऊन नाटक परिपूर्ण करतात. म्हणून 'नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे,' असे म्हटले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.