Advertisements
Advertisements
प्रश्न
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
उत्तर
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांना समाजजीवनात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जन्माला आली की घरात निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे. नाही असे नाही. पण ती सुशिक्षितांच्या घरांत. अशिक्षितांच्या घरांत किंवा ग्रामीण भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळ जवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो.
स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात. त्यांच्यात शारीरिक क्षमता कमी असते. त्या मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगांत त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषांएवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची, किचकट कामे त्यांना झेपत नाहीत. वगैरे वगैरे गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागांत तर चारचौघांची बैठक चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये, असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी-भांडी व मुलांचे संगोपन एवढ्याच गोष्टी पाहाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही.
पूर्वी प्राधान्याने मुलग्यांनाच शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. दहावीपर्यंत तरी मुलींना आडकाठी केली जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढूनही शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर आपण दुबळा ठेवला, तर पूर्ण ' समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार?
स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे त्याला विरोध केला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत. त्याला कोणताही पर्याय नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
ज्ञानेंद्रिये | संवेदनांची उदाहरणे |
(१) डोळे | |
(२) कान | |
(३) नाक | |
(४) त्वचा |
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
खालील कृती करा.
खालील कृती करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.