मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी! - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेत कसे, चहुकडे हिरवे गालीचे!

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे!

अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती
साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो 'सोन्याचा गोळा?'

(1) चौकटी पूर्ण करा:   (2)

  1. सोनेरी मुकुट घालणारी - ______
  2. साळीवर झोपणारी - ______

(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:   (2)

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तन्हेत-हेचे इंद्रधनुष्याचे!

आकलन

उत्तर

(1)

  1. सोनेरी मुकुट घालणारी - झाडे
  2. साळीवर झोपणारी - फुलपाखरे

(2) फुलपाखरांचे पंख सोनेरी, मखमली, रुपेरी आणि विविध रंगांचे असतात. त्यांचे रंग आणि नमुने इंद्रधनुष्याप्रमाणे वेगवेगळ्या तऱ्हेचे आणि आकर्षक असतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×