Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात माहिती लिहा.
एकजनुकीय विकृती
उत्तर
निर्दोष जनुकामध्ये काही कारणांनी उत्परिवर्तन होते, जे पेशीतील DNA खंडात झालेले बदलांमुळे सदोष जनुक तयार करतात. यामुळे जे विकार उद्भवतात, त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. सुमारे 4000 हून अधिक मानवी विकार अशा प्रकारे उत्परिवर्तनांमुळे होतात. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी प्रथिने किंवा विकरे अशी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे चयापचय बिघडतो. हे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरतात, उदाहरणार्थ हचिनसन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमीया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टीक फायब्रॉसिस, वर्णकहीनता, हीमोफेलिया, रातांधळेपणा इत्यादी.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? स्पष्ट करा.
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे?
थोडक्यात माहिती लिहा.
डाऊन्स सिंड्रोम / मंगोलिकता
थोडक्यात माहिती लिहा.
सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना
अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?
अ | ब | क |
लेबेरची आनुवंशिक चेताविकृती | 44 + xxy | निस्तेज त्वचा, पांढरे केस |
मधुमेह | 45 + x | पुरुष प्रजननक्षम नसतात. |
वर्णकहीनता | तंतूकणिका विकृती | स्त्रिया प्रजननक्षम नसतात. |
टर्नर सिंड्रोम | बहुघटकीय विकृती | भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होत. |
क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम | एकजनुकीय विकृती | रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम |
सहसंबंध लिहा.
44 + X : टर्नर सिंड्रोम : : 44 + XXY : ______
सहसंबंध लिहा.
स्त्रिया : टर्नर सिंड्रोम : : पुरूष : ______
आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघतक्ता तयार करा.