Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
उत्तर
सामान्यांत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्त्वांना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखतकारावर असते. गृहिणी, विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, संपादक, पत्रकार, कवी, लेखक, गिर्यारोहक, समुपदेशक, खेळाडू, तंत्रज्ञ, शेतमजूर, कामगार अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याचा प्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो. मुलाखतीत अशा कार्यसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकता येतो. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, संघर्ष, जिद्द, परिस्थितीशी झुंज, सोबतीचे स्नेहीजन अशा कितीतरी गोष्टींवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो. हे जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते. मुलाखतीतून असा खडतर जीवनप्रवास जाणून घेता येतो. जगावेगळी आव्हाने पेलून स्वतःच्या कार्याने 'स्व' सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याचे कार्य.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
प्रश्नांची निर्मिती
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
पोस्टमन
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती
मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.
भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.
मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.