मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टिप लिहा. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिप लिहा.

प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत.
  2. सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात.
  3. असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात.
  4. विकास न होण्यामागील कारणे ही भौतिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणे म्हणून ओळखली जातात.
  5. या निकषांनुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधींची तरतूद करण्यात येते.
  6. त्यानंतर या क्षेत्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी विभागनिहाय गुंतवणूक केली जाते.
  7. या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. तसेच रस्ते, शाळा, कृषिसिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादींच्या विकासासाठी आर्थिक मदत/तरतूद केली जाते.
  8. आदिवासी प्राबल्य क्षेत्र, पर्वतीय क्षेत्र, ओसाड क्षेत्र, दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते.
  9. उद्योगांचेविकेंद्रीकरण हे धोरणदेखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते.
shaalaa.com
प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: प्रदेश आणि प्रादेशिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास
स्वाध्याय | Q ३. २) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×