Advertisements
Advertisements
Question
टिप लिहा.
प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण.
Answer in Brief
Solution
- भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत.
- सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात.
- असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात.
- विकास न होण्यामागील कारणे ही भौतिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणे म्हणून ओळखली जातात.
- या निकषांनुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधींची तरतूद करण्यात येते.
- त्यानंतर या क्षेत्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी विभागनिहाय गुंतवणूक केली जाते.
- या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. तसेच रस्ते, शाळा, कृषिसिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादींच्या विकासासाठी आर्थिक मदत/तरतूद केली जाते.
- आदिवासी प्राबल्य क्षेत्र, पर्वतीय क्षेत्र, ओसाड क्षेत्र, दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते.
- उद्योगांचेविकेंद्रीकरण हे धोरणदेखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते.
shaalaa.com
प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे
Is there an error in this question or solution?