Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना.
टीपा लिहा
उत्तर
(१) ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी सन २००० मध्ये केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' सुरू केली.
(२) एक हजारपर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांना जोडण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. २००१ मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजने 'त समाविष्ट करून २००५ पर्यंत सुमारे ७५००० कि.मी. लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार केले गेले.
(३) देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळून त्यांचे जीवन सुखकारक करणे, हा या योजनेचा उद्देश होता.
(४) आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, घरे, रस्ते व वीज या सुविधांचा विकास ग्रामीण भागात करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अमलात आली.
shaalaa.com
विविध क्षेत्रांतील बदल - ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?