Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारताने अवकाश संशोधनासाठी 'इस्रो'ची स्थापना केली. 'आर्यभट्ट' या पहिल्या उपग्रह नंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडले.
- अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह आता भारत अवकाशात पाठवू लागला आहे.
- भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह वाजवी नफा घेऊन अवकाशात सोडले आहेत.
- २००८ मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-१ या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले.
- भारताने 'मंगळयान' आणि 'चांद्रयान-२' हे उपग्रह सोडले.
- भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रितीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?