Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
अभिरूप सराव
टीपा लिहा
उत्तर
अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यास उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. यासाठी आपत्ती आल्यावर करायच्या प्रतिसादाच्या प्रक्रिया तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते. अशा सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी अभिरूप सराव उपयुक्त ठरतो. यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आल्या असतात. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणांच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त असतो.
shaalaa.com
अभिरूप सराव (Mock drill)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?