Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
भारतातील शेती
टीपा लिहा
उत्तर
- भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय असून यात जास्त मनुष्यबळ गुंतलेले आहे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे.
- भारतातील शेती प्रामुख्याने निर्वाह प्रकारची आहे. भारतातील सुमारे ६०% भूभाग लागवडीखाली आहे. विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील विविधता इत्यादी घटक भारतातील शेती व्यवसायातील वाढीस कारणीभूत ठरले आहेत.
- भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका ही प्रमुख पिके, तसेच चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग ही नगदी पिके घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, भाजीपाला तसेच मसाल्याचे पदार्थ पिकवणारा देश आहे.
- भारतातून प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कापूस, रेशीम कापड व आंबे निर्यात केले जातात.
shaalaa.com
भारतामधील आर्थिक व्यवसाय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?