Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
कोठारी आयोग
टीपा लिहा
उत्तर
- १९६४ मध्ये डॉ.डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात जे.पी.नाईक यांचे मोलाचे योगदान आहे.
- यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १० + २ + ३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. १९७२ पासून ही व्यवस्था अमलात आली.
- कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले.
- अनुसूचित जाती- जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या.
- महाराष्ट्र राज्याने १० + २ + ३ ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची पहिली शालान्त परीक्षा घेतली.
shaalaa.com
कोठारी आयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?