Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
टीपा लिहा
उत्तर
- देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
- संयुक्त राष्ट्रे या संघटनेने १९७० हे वर्ष ‘जागतिक शैक्षणिक वर्ष’ घोषित केले होते.
- याच वर्षी भारत सरकारचेशिक्षण व समाजकल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्त विद्यापीठ’ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली.
- १९७४ मध्ये सरकारने पी.पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशींनुसार २० सप्टेंबर १९८५ रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले.
- या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने १९९० मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक्-श्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला.
- विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे, परदेशात ४१ केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली.
shaalaa.com
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?