Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
मिश्र अर्थव्यवस्था
टीपा लिहा
उत्तर
ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खासगी मालकीची असतात आणि काही समाजवादी म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात तिला 'मिश्र अर्थव्यवस्था' म्हणतात. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकत्र चालवले जातात उदा. भारत. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणांस तीन भाग दिसून येतात.
- सार्वजनिक क्षेत्र - या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियत्रंणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदा., संरक्षण साहित्य उत्पादन.
- खासगी क्षेत्र - या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदा., उपभोग्य वस्तू.
- संयुक्त क्षेत्र - या क्षेत्रात काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे, तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात.
shaalaa.com
मिश्र अर्थव्यवस्था
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]