Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
(१) भारताने स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच साम्राज्यवादा विरोधात आवाज उठवलेला आहे, कारण भारत लोकशाही मूल्ये पाळणारा देश आहे.
(२) भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही, कारण त्याने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे.
(३) भारत अन्य देशांचा हस्तक्षेप स्वीकारत नाही त्याचप्रमाणे तो अन्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल व सार्वभौमत्व बद्दल आदर बाळगतो.
(४) विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य यावे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांकडे केली होती.
(५) परकीय सत्तांनी वसाहतींमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला.
(६) शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे.
अशा रितीने भारत वसाहतवाद विरोधात नेहमीच आपली भूमिका मांडत आला आहे.
shaalaa.com
वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?