Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.
टीपा लिहा
उत्तर
(१) दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले.
(२) या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला; तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व व पश्चिम असे विभाजन झाले.
(३) पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला; तर पश्चिम युरोपातील राष्ट्रे अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली.
प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली.
shaalaa.com
शीतयुद्ध व्याख्या
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?