Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- सार्क संघटने आतापर्यंत काही क्षेत्रांत चांगली कामगिरी बजावली आहे. यात बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून बी-बियाणे, पशुधन आणि मत्स्योत्पादन यात संशोधन सुरू झाले.
- ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापले, काठमांडूमध्ये अिस्थरोग निवारण केंद्र सुरू झाले. सार्क देशांमध्ये पर्यटनास चालना देण्यात आली.
- दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्यासाठी सार्कने ‘आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ’ यांच्या मदतीने प्रयत्न केले.
- व्यापार वृद्धीसाठी ‘उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ’ स्थापण्यात आले. सार्क दस्तऐवज केंद्रांच्या माध्यमातून माहिती पुरविण्याची सोय करण्यात आली.
- इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापण्यात आले. अमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आले. डाकसेवा, दळणवळण अशासारख्या महत्त्वाच्या विषयांवर समित्या स्थापण्यात आल्या.
shaalaa.com
सार्क
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?