Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
इ.स.१९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.
उत्तर
(१) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगिजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते; परंतु गोवा सोडण्यास त्यांनी नकार दिला.
(२) गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी. बी. कुन्हांसारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह केले, आंदोलने केली.
(३) पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले, जनतेवर अत्याचार केला.
(४) अखेरीस गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल केंद्र सरकारला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना घ्यावी लागली.
(५) त्यांनी 'ऑपरेशन विजय' ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला.
(६) संस्थानांच्या विलीनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलीनीकरण झाले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गोवा येथे इ.स. १९४६ मध्ये ______ यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख - ______
खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते?
२. भारतातील पोर्तुगिजांचे सत्ताकेंद्र कोणते?
३. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ताकेंद्रे कोणती?
४. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.