मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

प्रथम आपण स्वीकारले पाहिजे की काही बाबतीत यंत्र मानवापेक्षा उत्कृष्ट आहेत. उदाहरणार्थ, संगणकच बघा. हा विविध कामे अचूकपणे आणि जलदगतीने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अप्रतिम आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या कामकाजात भरीव प्रगती झाली आहे. दैनंदिन कामे आता अधिक सुलभ आणि द्रुतगतीने होतात. आपण घरूनच अनेक कामे करू शकतो, त्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतो. बरेच जण घरूनच कार्यालयीन कामे करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. मात्र, ही यंत्रे कधीही मानवासाठी सर्वोत्तम पर्याय बनू शकत नाही. सांगितलेली कामे यंत्रे योग्यरीत्या पूर्ण करतील, हे खरे पण, सांगितलेले काम योग्य की अयोग्य, त्या कामामुळे मानवतेला हानी पोहोचेल का, केलेली कृती सौंदर्याने परिपूर्ण आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. हे केवळ माणूसच देऊ शकतो.

shaalaa.com
यंत्रांनी केलं बंड
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q ७. (अ) | पृष्ठ ४०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×