Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर
प्रथम आपण स्वीकारले पाहिजे की काही बाबतीत यंत्र मानवापेक्षा उत्कृष्ट आहेत. उदाहरणार्थ, संगणकच बघा. हा विविध कामे अचूकपणे आणि जलदगतीने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अप्रतिम आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या कामकाजात भरीव प्रगती झाली आहे. दैनंदिन कामे आता अधिक सुलभ आणि द्रुतगतीने होतात. आपण घरूनच अनेक कामे करू शकतो, त्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतो. बरेच जण घरूनच कार्यालयीन कामे करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. मात्र, ही यंत्रे कधीही मानवासाठी सर्वोत्तम पर्याय बनू शकत नाही. सांगितलेली कामे यंत्रे योग्यरीत्या पूर्ण करतील, हे खरे पण, सांगितलेले काम योग्य की अयोग्य, त्या कामामुळे मानवतेला हानी पोहोचेल का, केलेली कृती सौंदर्याने परिपूर्ण आहे का, अशा प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. हे केवळ माणूसच देऊ शकतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फरक सांगा.
यंत्रांद्वारे केली जाणारी कामे | माणसांद्वारे केली जाणारी कामे |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?
यंत्र | कार्य |
(१) रोबो फोन | (१) ______ |
(२) यंत्रमानव | (२) ______ |
(३) सह्याजी | (३) ______ |
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
- ______
- ______
- ______
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा.