Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
आग्र्याहून सुटका
सविस्तर उत्तर
उत्तर
- शिवाजी महाराजांना दख्खनच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी जयसिंगने शिवाजी महाराजांना आग्रा येथे जाऊन बादशाहाला भेटण्याचा प्रस्ताव दिला.
- शिवाजी महाराज, राजे संभाजी आणि त्यांच्या काही विश्वासू लोकांसह आग्र्याला निघाले.
- महाराज आग्र्यास पोहचले. तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला, त्यानंतर बादशाहाने त्यांना नजरकैदेत ठेवले.
- बादशाहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्ऱ्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहचले. आग्ऱ्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?