Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण
दीर्घउत्तर
उत्तर
शिवाजी महाराजांनी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रुसैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी, हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवावे, अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?