Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत लिहा.
शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते
दीर्घउत्तर
उत्तर
- प्रजेला स्वतंत्र बनवणे, हा शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश होता.
- इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे, एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही.
- प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल,तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे, याचे भान त्यांना होते.
- महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?