Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'नवसूर्य पहा उगवतो', 'संघर्ष पहा बहरतो' या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
'नवसूर्य पहा उगवतो' -
सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञानरूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे. नवनवीन शोध लागत आहे जसे की, संगणक, विमान, यामुळे जग अगदी जवळ आले आहे.
संघर्ष पहा बहरतो -
पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे. विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले, शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते. या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?