Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते?
थोडक्यात उत्तर
उत्तर
मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय, मूत्रोत्सर्जक नलिका चा समावेश होतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते.
मूत्र तयार करण्याची प्रक्रिया:
- मूत्र मूत्रपिंडात तयार होते आणि मूत्रमार्गाद्वारे मूत्राशयात जाते. मूत्राशय मूत्रमार्गाद्वारे उत्सर्जित होईपर्यंत मूत्र संचयित करते.
- नेफ्रॉनच्या बोमन्स संपुटात ग्लोमेरुलस हे रक्तकेशिकांचे जाळे असते. यकृतात चयापचयाच्या कारणाने तयार झालेला युरिया रक्तात येतो. हे युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुलसमध्ये येते, त्या वेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते.
- बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात.
- बोमन्स संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत उतरतो. नेफ्रॉन नलिकेच्या विविध भागांत पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते.
- शरीराला आवश्यक नसलेल्या सर्व घटक द्रव्यांपासून मूत्र तयार होते.
- तयार झालेले मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात काही काळापर्यंत साठवले जाते.
-
मूत्र विसर्जन करण्यावर आपले ऐच्छिक नियंत्रण असते. त्यामुळे इच्छा झाल्यावर मूत्रोत्सर्जन मागांद्वारे ते बाहेर टाकले जाते.
shaalaa.com
मानवामधील उत्सर्जन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?