Advertisements
Advertisements
प्रश्न
उमाजी नाईक यांच्या बंडाची माहिती लिहा.
सविस्तर उत्तर
उत्तर
- चितूरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला.
- संतू नाईक व उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते.
- पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज त्यांनी ताब्यात घेतला. १८२४ मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यांनी इंग्रजांच्या नाकी दम आणला.
- या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी आणि त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपयांचे इनाम घोषित केले.
- गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पैसा देऊ नये, असे आदेश हा उठाव मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी काढला. सरकारने वतने जप्त करण्याची धमकी दिली. उमाजींबद्दलची माहिती सरकारला ताबडतोब दिलीच पाहिजे असा आदेश दिला. शरण येणाऱ्यांना माफी देण्यात आली.
- कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या पाच कंपन्या घेऊन उमाजींच्या पाठलागावर निघाला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
- सातारा, वाई, भोर, कोल्हापूर येथे सतत संघर्ष चालू होता.
- कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजींचा पाठलाग सुरू केला. उमाजींनी इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले. अखेर भोरजवळ इंग्रजांनी उमाजींना पकडले.
- उमाजी नाईक यांच्यावर खटला भरून त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?