मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण आहे हे सिद्ध करा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण आहे हे सिद्ध करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. समजा, सुरुवातीला वस्तू A बिंदूवर आहे व तिच्यातील स्थितिज ऊर्जा (P.E. = mgh) आहे.
  2. जेव्हा फक्त गुरुत्वाकर्षण बलाने वस्तूचे A बिंदू पासून C बिंदूपर्यंत विस्थापन होते, तेव्हा ते मुक्‍तपतन आहे असे म्हटले जाते.
  3. वस्तूचा जमिनीलगतचा म्हणजेच बिंदू C वरील वेग vc आहे असे मानू.
  4. वस्तूचा आरंभिक वेग शून्य आहे. वस्तूने कापलेले अंतर म्हणजे मुक्‍तपतनाची उंची (h) आणि गुरुत्वीय त्वरण (g).
    म्हणजेच, u = 0, s = h, a = g
  5. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार ,
    `"v"^2 = "u"^2 + 2"as"`
    `"v"_"c"^2 = 0 + 2"gh"`
    `"v"_"c"^2 = 2"gh"`   ....(1)
  6. वस्तूची गतिज ऊर्जा,
    K.E. = `1/2"mv"^2`
    K.E. = `1/2"mv"_"c"^2`
    K.E. = `1/2"m"(2"gh")`   ....[(1) वरून]
    ∴ K.E. = mgh
  7. म्हणजेच, उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचेच रूपांतरण असते.
shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - स्थितिज ऊर्जा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ २८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×