Advertisements
Advertisements
प्रश्न
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज.
उत्तर
घसारा
स्पष्टीकरण:
भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एकसमान, सामाईक, स्वीकार्य असे प्रमाणदर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते.
संबंधित प्रश्न
राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी
(अ) बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न
(ब) दुहेरी गणनेची समस्या
(क) अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी
(ड) मालाच्या साठ्याचे मूल्य
विसंगत शब्द ओळखा.
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी:
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ५०००/- निवृत्तीवेतन मिळते.
राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.