English

उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Questions

आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:

उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.

आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:

उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज.

One Word/Term Answer

Solution

घसारा

स्पष्टीकरण:

भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एकसमान, सामाईक, स्वीकार्य असे प्रमाणदर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते.

shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: राष्ट्रीय उत्पन्न - आर्थिक पारिभाषिक शब्द

APPEARS IN

SCERT Maharashtra Economics [Marathi] 12 Standard HSC
Chapter 7 राष्ट्रीय उत्पन्न
आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×