Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- शेताचे क्षेत्र २०० हेक्टर किंवा अधिक असते.
- मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेतीयंत्रांच्या साहाय्याने केली जाते. उदा., नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो.
- एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदा., गहू किंवा मका. याशिवाय बार्ली; ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात.
- या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदा., यंत्रखरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते.
- अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत.
- समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]