Advertisements
Advertisements
प्रश्न
मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
प्लान्टेशन शेतीच्या खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत:
- शेतीचे क्षेत्र ४० हेक्टर किंवा अधिक असते.
- शेतीचे क्षेत्र डोंगरउतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते.
- प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे.
- या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा., चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.
- या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहतकाळात झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.
- दीर्घकालिक पिके, शास्त्रशुदूध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.
- मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत.
- या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]