Advertisements
Advertisements
प्रश्न
वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा:
वसाहतवादाचे परिणाम
थोडक्यात उत्तर
उत्तर
- आशिया व आफ्रिका या खंडांतील लोकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले.
- आर्थिक शोषणाची परिणती स्थानिक लोक दरिद्री होण्यात झाली. वसाहतवादाच्या विघातक परिणामांच्या जोडीला वसाहतींमध्ये काही विधायक गोष्टी घडल्या.
- वसाहतींमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. लोकशाही पद्धत आणि त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या आधुनिक जीवनमूल्यांचा त्यांना परिचय झाला.
- कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण यांसारखे विचार पुढे आले. आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत हा विचार पुढे आला. त्यामुळे वसाहतींमधून स्वातंत्र्याची चळवळ उदयाला आली.
shaalaa.com
वसाहतवादाचे परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?