Advertisements
Advertisements
प्रश्न
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज
उत्तर
- शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगिजांशी संपर्क आला.
- शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले.
- पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगिजांना जेरीस आणले. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. गोव्याच्या व्हॉईसरॉयने दडपण आणताच ही मदत बंद झाली.
- जंजिऱ्याच्या सिद्दीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगिजांनी सिद्दीला मदत केली.
- सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. मिर्झा राजे जयसिंग याच्या आक्रमणावेळी पोर्तुगिजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली.
- शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगिजांनी दाभोळ येथे वखार उघडली. पोर्तुगिजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोक असंतुष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
'ब' गट |
१. कास्मो-द-ग्वार्द |
- पोर्तुगीज इतिहासकार |
२. गोंसालू मार्तीस |
- पोर्तुगीज वकील |
३. फ्रांस्वाँ मार्टिन |
- डच वखारीचा प्रमुख |
४. हेन्री रेव्हिंग्टन |
- इंग्रज अधिकारी |
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______
तुमचे मत नोंदवा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
तुमचे मत नोंदवा.
मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज
पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:
पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज