मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र यातून आपल्याला त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या घेतलेल्या धोरणातील पुढील बाबी स्पष्ट होतात -

(१) पोर्तुगीज, डच, इंग्रज हे व्यापारी सावकारांप्रमाणे नसून; त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे.
(२) हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात येऊन जम बसवतात.
(३) युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत.
(४) म्हणून या व्यापाऱ्यांशी कामापुरताच संबंध ठेवावा.
(५) त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये.
(६) वखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल; तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यालगतची जागा देऊ नये.
(७) जागा दयायचीच झाली तर समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ दयावी.
(८) हे व्यापारी आपल्या आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदरांच्याजवळ त्यांना जागा देऊ नये.
(९) या व्यापाऱ्यांच्या मार्गात आपण आडवे जाऊ नये व त्यांनाही आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये.
(१०) शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा युरोपीय व्यापारी सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये.

shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - पोर्तुगीज - मराठे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 4 वसाहतवाद आणि मराठे
स्वाध्याय | Q ४.१ | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.


थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.


पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कास्मो-द-ग्वार्द

- पोर्तुगीज इतिहासकार

२. गोंसालू मार्तीस

- पोर्तुगीज वकील

३. फ्रांस्वाँ मार्टिन

- डच वखारीचा प्रमुख

४. हेन्री रेव्हिंग्टन

- इंग्रज अधिकारी


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______


तुमचे मत नोंदवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.


तुमचे मत नोंदवा.

मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज


पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा:

पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×